आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्‍यातील गावांचा पाणीप्रश्‍न सुटला

मंचर- डिंभे धरण (हुतात्मा बाबु गेणु सागर) शंभर टक्के भरल्याने आणि घोडनदी दुथडी भरून वाहत असल्याने बारमाही पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे, त्यासाठी घोडनदीचे कळंब येथे पाणी पूजन आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे यांच्या हस्ते करण्यात आले.
आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी डोंगरी भागात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गुरूवारी (दि.16) डिंभे धरण (हुतात्मा बाबु गेणु सागर) शंभर टक्के भरल्याने घोडनदीला पूर आला. नदी वाहू लागल्याने आणि धरण भरल्याने आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्‍यातील बहुतांशी गावांचा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला.कळंब येथे घोडनदीला वाहत असलेल्या पाण्याचे आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे यांनी विधिवत पूजन केले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या कुटुंबातील अंजना कानडे, पुनम कानडे, तसेच इतर महिला सदस्य उपस्थित होत्या.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)