आंबेगाव वसाहत येथे शालेय साहित्य वाटप

मंचर- गुरुपौर्णिमेनिमित्त 80 हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत येथे करण्यात आले, यावेळी पालकांसह, ग्रामस्थ उपस्थित होते. आंबेगाव पुनर्वसन घोडेगाव येथे यशवंतराव चव्हाण विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील संस्थापक असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संस्थेच्या वतीने इयत्ता पाचवीच्या वर्गातील 35 विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या व पाठ्य पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. विलास आप्पा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमनाथ काळे मित्र मंडळ घोडेगाव यांच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल 35 विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. गणवेश वाटप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भालेकर ,सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा काळे, माजी उपसभापती संजय गवारी, सरपंच नीलेश घोलप अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष राजू पानसरे, खंडू खंडागळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती प्रकाशराव घोलप होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. के. लोहकरे यांनी केले, तर वंदना मंडलिक यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी योग्य नियोजन शिक्षक आर. बी. अरगडे, एस. जे. बांगर, व्ही. जी. काळे, एम. आर .आढळराव, एल. पी. वाघ, के. एस. ढेरंगे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)