कात्रज परिसरातील आंबेगाव परिसरात दगडफेक करुन दहशत निर्माण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्यासोबत असलेल्या तीन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अक्षय इंगुळकर, अमित ऊर्फ बाप्पू धनावडे, अभिजीत सावंत आणि त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. शिवाजी घोलप (रा. ईश्वरी बंगला, आंबेगाव खुर्द) यांनी यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. घोलप यांच्या घरी मंगळवारी रात्री धार्मिक कार्यक्रम होता. त्यावेळी टोळक्‍याने एका युवकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. घाबरलेला युवक घोलप यांच्या बंगल्यात शिरला, त्यावेळी टोळक्‍याने त्याचा पाठलाग केला. घोलप यांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यात आली. टोळक्‍यातील काही जणांकडे बांबू तसेच लोखंडी गज होते. त्यांनी परिसरातील नागरिकांना धमकावले. दगड फेकून मारल्यामुळे दोन नागारिकांना दुखापत झाली होती. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून माग काढण्यात येत होता. आरोपी इंगुळकर, धनावडे, सावंत आणि अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, गुन्हे शाखेचे निरीक्षक राजकुमार वाघचवरे, उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पृथ्वीराज ताटे, अमोल पवार, कुंदन शिंदे, चंद्रकांत फरताडे, कृष्णा निढाळकर, प्रणव संकपाळ, सर्फराज देशमुख, गणेश चिंचकर यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)