आंबेगाव प्रगत होण्यासाठी शिक्षकांनी साथ द्यावी – महाजन

मंचर – शिक्षण हक्‍क कायदा (आरटीई) नुसार विशेष गरजा असणाऱ्या मुलांसह सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रभावी शैक्षणिक संधी उपलब्ध करणे, त्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणे, बालकांमधील उणिवा ओळखणे व प्रभावी उपायांद्वारे विद्यार्थी आणि शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी विद्या प्राधिकरण पुणेद्वारा सर्वच शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. आंबेगाव तालुका योग्य प्रकारे प्रगत होण्यासाठी प्रशासनाच्या उपायांना शिक्षकांनी साथ द्यावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलहरे (ता. आंबेगाव) येथे इयत्ता पहिली ते पाचवीच्या 100 टक्‍के विद्यार्थ्यांचे विविध गणिती क्रिया संबोध विकसन तीन दिवसीय कार्यशाळा समारोप प्रसंगी वळती, चांडोली बुद्रुक येथील शिक्षकांना मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी बोलत होते.
यावेळी शाळा समिती अध्यक्ष पांडुरंग डोके, प्रशिक्षण समन्वयक केंद्रप्रमुख विजय सुरकूले, भिका मिरके आदी उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी महाजन म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मराठी, गणित, इंग्रजी परिसर अभ्यासातील बालकांच्या कौशल्याचे योग्यप्रकारे निर्धारण करता यावे. यासाठी सर्व शिक्षकांनी शिक्षक विकसन प्रशिक्षण आत्मीयतेने घ्यावे. आदर्श शिक्षिका प्रमिला जोरी, तंत्रस्नेही शिक्षक तुषार शिंदे, उपक्रमशील शिक्षिका निशा बोऱ्हाडे यांनी शंभर टक्‍के विद्यार्थ्यांना संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया संबोध विकसित व्हावेत म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी गणित संख्याशास्त्र आयआयटीजे एममध्ये 163 व्या क्रमांकाने देशात उत्तीर्ण झालेल्या संतोष नानाभाऊ पळसकर या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. केंद्रप्रमुख विजय सुरकूले मुख्याध्यापिका मनीषा कानडे, सहायक शिक्षक प्रदीप चासकर यांनी गणित शिक्षक विकसन प्रशिक्षणाचे यशस्वी नियोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)