आंबेगाव तालुक्‍यात बैलपोळ्याचा सण उत्साहात

लाखणगाव- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील काठापूरसह विविध गावांत रविवारी (दि. 9) श्रावणी बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पुरणाची पोळी नैवेद्य दाखवून बैलांची पूजा करण्यात आली.
कळंब, काठापूर, शिंगवे, खडकी, लौकी इत्यादी गावांमध्ये बैलपोळा सण साजरा करण्यात आला. यावेळी बैलांना रंगरंगोटी करुन त्यांची वाजतगाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. आंबेगाव तालुका हा बागायती तालुका असल्यामुळे बैलांचा शेतीतील वापर कमी होऊन टॅक्‍टरचा मोठ्‌या प्रमाणात वापर वाढला आहे. त्यामुळे बैलांची संख्या मोठ्‌या प्रमाणात कमी आहे. त्यातच मागील काही वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद झाल्यामुळे त्यांची ही संख्या झपाट्‌याने कमी झाली आहे.
परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या दारात असणाऱ्या बैलजोड्या दिसेनाशा झाल्या आहेत. ठराविकच शेतकऱ्यांकडेच बैलजोड्या पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी टॅक्‍टरची सजून मिरवणूक काढतात. तर मातीच्या बैलांची पूजा करून बैलपोळा सण साजरा करतात. काठापूर बुद्रुक येथेही शेतकऱ्यांनी बैलांना रंगरंगोटी करुन त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून सण साजरा केला. सध्या झपाट्‌याने कमी झालेल्या बैलांच्या संख्येमुळे फारच थोड्या शेतकऱ्यांकडे खऱ्याखुऱ्या बैलांची पूजा होताना पहावयास मिळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)