आंबेगाव तालुक्‍यात पिकांना इतर माध्यमांतून पाणी

मंचर- आंबेगाव तालुक्‍यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेती पिके सुकू लागली असू, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेती पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली असून सध्या शेतकरी इतर माध्यमांतून शेती पिकांना पाणी देऊ लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता नाही. अशा शेतकऱ्यांची पिके मात्र सध्या सुकू लागली आहेत. अनेक शेतकरी शेती पिकांना विहीर, तलाव, नदीच्या माध्यमातून पाणी देत आहेत.
सध्या डिंभे धरणात (हुतात्मा बाबु गेणु सागरात) 85 टक्‍के पाणीसाठा झाला आहे. डिंभे धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने अनेक शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत पावसाने पुन्हा एकदा ताण दिला असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांनी पावसावर पेरणी केली होती. त्या शेतकऱ्यांना सध्या पावसाची गरज आहे. वातावरण ढगाळ असले तरी पाऊस मात्र पडत नाही .त्यामुळे येरे येरे पावसा अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

  • चाराही लागला सुकू
    पिकाबरोबरच माळरानावर आणि डोंगरावर उगवलेल्या चाऱ्यालाही पावसाची गरज निर्माण झाली आहे. पाऊस जर पडला नाही तर हा उगवलेला चाराही सुकून जाईल किंवा त्याची वाढ होणार नाही, त्यामुळे मेंढपाळ आणि पाळीव प्राण्यांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)