आंबेगाव तालुक्‍यात ऊस तोडणी संपुष्टात

संग्रहित फोटो

बुंधे छाटणीचे काम ट्रॅक्‍टरच्या साह्याने सुरू

लाखणगांव – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणी उरकत आली असून, तोडलेल्या उसाच्या बुंधांच्या छाटणीचे काम टॅक्‍टरच्या सहाय्याने सुरू आहेत.
आंबेगाव तालुका हा उसाचा आगर म्हणून ओळखला जातो. बारमाही पाण्याच्या उपलब्धतेमुळे येथील शेतकरी ऊस पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. सध्या या भागात उसाची तोडणी झाली असून, ठेवलेल्या उसाचे बुंधे छाटणीचे काम सुरू आहे. ट्रॅक्‍टरच्या साह्याने बुंधे छाटणी करण्याचे काम सध्या शेतकरी करीत आहेत. ट्रॅक्‍टरच्या साह्याने बुंधे छाटणी केल्याने उसाची उगवण चांगली होते. सध्या पंधराशे रुपये हेक्‍टर या दराने टॅक्‍टरचालक बुंधे छाटणी करत आहेत. बुंधे छाटणी आणि सरी फोडण्याचे काम एकाच वेळी होत असल्याने शेतकरी हे काम करण्यासाठी ट्रक्‍टरलाच पसंती देत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)