आंबेगाव तालुक्‍यात अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली सभा

मंचर- माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणाने प्रभावित झालो. त्यांचा उत्साह मला प्रभावित करूत असे. कारण मी गेलो की, ते आवर्जून म्हणायचे की, आप छत्रपती शिवाजी महाराजने भेजे हुए सांसद हो, इसलिय आपका उतनाही आदर है… आणि खूपच मोकळेपणाने बोलू लागायचे. त्यांचा असा एवढा आदरपूर्वक संवाद ऐकून आपण भाग्यवान असल्याची अनुभूती त्यांच्याबरोबर बोलताना प्रत्येक शब्दात व्यक्त होत होती. या शब्दात त्यांच्या कार्याचे कौतुक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. आंबेगाव तालुका भाजप पक्षाच्या वतीने मंचर येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, सुनील बाणखेले, रवींद्र करंजखेले, मिलिंद खुडे, वसंतराव बाणखेले, कैलास राजगुरव, किरण महाजन, भानुदास काळे, अल्लु इनामदार, कैलास बाणखेले, प्रमोद बाणखेले, बाबु थोरात, गणेश बाणखेले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने एक चांगला सुसंकृत पुन्हा होणे नाही, या शब्दात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपली श्रद्धांजली व्यक्त केली .यावेळी भाजपचे सरचिटणीस पांडुरंग ठाकुर, भाजपचे तालुका अध्यक्ष संजय थोरात, सरपंच दत्ता गांजाळे, भाजपचे संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष राजू इनामदार,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, संतोष बाणखेले, रवींद्र त्रिवेदी, डॉ. ताराचंद कराळे, दत्तात्रय थोरात, आशिष पुगंलिया, विठ्ठल महामुनी, भगवान ढुमणे, दयानंद खेडकर, ऍड.चेतन उदावंत, शमशुल सय्यद, जितेंद्र त्रिवेदी, दत्तात्रय शेटे यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. कार्यक्रमाचे संयोजन भाजप तालुका अध्यक्ष संजय थोरात यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार नवनाथ थोरात यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)