आंबेगाव तालुक्‍यातील बाजारामध्ये आर्थिक मंदीचे सावट

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील बाजारामध्ये आर्थिक मंदीचे सावट जाणवू लागले आहे. शेतकऱ्यांच्या बहुतांशी तरकारी मालाला बाजारभाव नसल्याने त्यातच मराठा आरक्षणाबद्दल चालू असलेले मराठा मोर्चे, त्यामुळे होणारा ताणतणाव या कारणानेसुद्धा बाजारात आर्थिक मंदीची लाट जाणवू लागली आहे.
आंबेगाव तालुक्‍यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने पूर्णतः दडी मारली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. आषाढ संपून आता श्रावण सुरू होत आहे, मात्र पावसाचे म्हणावे तसे आगमन नाही. त्यामुळे आधीच चिंतेत असलेला शेतकरी सध्याच्या अस्थिर वातावरणामुळे देखील त्रस्तझाला आहे. ग्रामीण भागातील सर्व आर्थिक व्यवहार शेतकरी कुटुंबावर अवलंबून असतात. शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे असतील तर ते उत्साहाने बाजारामध्ये खरेदी करतात.ग्रामीण भागातील सर्व जनजीवन शेतकऱ्यांच्या आर्थिक चलनावर अवलंबून असते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव नसल्याकारणाने बाजारात आर्थिक मंदीचे सावट जाणवू लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)