आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात व्यवहार बंद

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी, पिंपळगाव, पारगाव, लोणी, धामणी यांसह सर्वच गावांत व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. अवसरी खुर्द गावचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला. शाळा,महाविद्यालय, बॅंका, पतसंस्था बंद ठेऊन सरकारचा ग्रामस्थांनी निषेध केला.
अवसरी गावचा आठवडे बाजार गुरुवारी असतो; परंतु बंदमध्ये भाजीपाला व्यापाऱ्यांनी सहभाग दाखविल्याने आठवडे बाजार बंद होता. त्याचप्रमाणे अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पारगाव, लोणी गावांतील पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक, तसेच गावातील 10 ते 12 सहकारी पतसंस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. अवसरी खुर्द गावातील ग्रामस्थांनी श्री भैरवनाथ पालखी मार्गे मोर्चा काढून गावातील ग्रामपंचायत पटांगणात सरकारच्या विरोधात निषेध सभा घेतली. निषेध सभेत तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. अवसरी खुर्द गावात शासकीय महाविद्यालय आहे. या कॉलेजचे बरेचसे विद्यार्थी गावात वास्तव्यास आहे. गावातील हॉटेल, खानावळ बंद असल्याने कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सकाळचा चहा,-नाश्‍ता न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)