आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाची 4 ऑगस्टला बैठक

मंचर – आंबेगाव तालुका मराठा सकल समाजाची बैठक शनिवार दि. 4 रोजी दुपारी मंचर येथील शरद पवार सभागृहात आयोजित केली असल्याची माहिती ऍड. सुनील बांगर यांनी दिली. 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच मराठा समाजाचे मान्यवर बैठकीत उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)