आंबेगावात कमळ फुलविण्यासाठी कामाला लागा

मंचर- आंबेगाव विधानसभा मतदार संघात कमळ फुलविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अंग झटकुन काम करणे गरजेचे आहे. आपापसातील मतभेद विसरुन सर्वसामान्यांना ताकद देण्यासाठी भाजप पक्षाच्या पाठीमागे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी शक्ती उभी करावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीष बापट यांनी केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच 9 कोटी 39 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री बापट बोलत होते. याप्रसंगी आमदार संजय भेगडे, जिल्हा परिषदचे सदस्य शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य दिलीप मेदगे, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय थोरात, संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य भानुदास काळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष कैलास राजगुरव, पांडुरंग ठाकुर, माजी अध्यक्ष रविंद्र त्रिवेदी, भगवान ढुमणे, विजय पवार, प्रमोद बाणखेले, संदीप बाणखेले, शेखर मुदंडा, बाबू थोरात, गणेश बाणखेले, नवनाथ खांडगे, मारुती भवारी, धनंजय कोकणे, धनेश बाणखेले, साजिद सय्यद, किरण वाळुंज, यशवंत चपटे, सुदर्शन चपटे व निलेश साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध गावच्या तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
तालुकाध्यक्ष संजय थोरात यांच्या कामांचे कौतुक करताना मंत्री गिरीष बापट म्हणाले की, आंबेगाव विधानसभा मतदार संघात भाजपचे चांगले काम सुरू आहे. केंद्र आणि राज्यस्तरावरील विकासाची कामे सर्वसामान्यांपर्यत पोहचली पाहिजेत. कार्यकर्त्यांना ताकद देणे हे माझे कर्तव्य आहे. कार्यकर्त्यांना कोणीही त्रास दिला तर सहन केला जाणार नाही. राजकारणात कोणाची मक्तेदारी नाही. मी म्हणाऱ्यांची खर्ची मतदार फेकुन देतात. त्यामुळे जमिनीवर पाय ठेऊन कार्यकर्त्यांनी सत्तेचा गर्व न करता प्रामाणिकपणे काम करावे. मतदार नक्कीच न्याय देतील असे आशावाद मंत्री बापट यांनी व्यक्त केला.
संजय थोरात म्हणाले की, आंबेगाव विधानसभा मतदार संघात भाजप सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. मंत्री गिरीष बापट यांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली तर काही कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. कार्यकर्त्यांनी भाजपच्या माध्यमातुन होत असलेला विकास गावपातळीवर जाऊन सांगितला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कडलक यांनी केले तर नवनाथ थोरात यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)