आंबेगावात आज सर्वसमावेशक महामेळा

भीमाशंकर-आदिवासी बांधवांकरिता सर्वसमावेशक महामेळाव्याचे आंबेगाव तालुकात आयोजन महाराष्ट्र दिनाच्या औचित साधून एक मे रोजी आंबेगाव तालुक्‍यातील चिखली (ता. आंबेगाव) येथे प्रथमच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्यावतीने 1 मे रोजी सर्वसमावेशक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजाच्या हिताच्या दृष्टीने त्यांचा सर्वांगीण विकासाला केंद्रबिंदू मानून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण तरुणींसाठी उद्योग, व्यवसाय, विविध योजना, विवाहित जोडप्यांना कन्यादान योजनेचे धनादेश वाटप, भूमिहिन नागरिकांसाठी स्वाभिमान सबलीकरण योजना तसेच आदिवासींच्या विविध हस्तकलांचे प्रदर्शन, आदिवासी भागातील महिला गारमेंट फॅक्‍टरीचे उद्‌घाटन आणि सर्व आदिवासी बांधवांकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन या मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत जवळजवळ सात मेळावे प्रकल्प कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आले होते. हा महामेळावा याठिकाणी आयोजित करून सर्वसमावेशक संधी आदिवासी समाजाकरिता उपलब्ध करून देण्याचा मानस या ठिकाणी करण्यात आलेला आहे.
या मेळाव्यांमध्ये प्रथमच मुंबईवरून तज्ज्ञ डॉक्‍टरांचे एक पथक या करिता पाचारण करण्यात येणार आहे. मुंबई येथील नामांकित शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. उदय अंदर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रिती राजपुरोहित, डॉ. रितिका भारती, डॉ. सुजाता गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, खेडचे आमदार सुरेश गोरे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, मावळचे आमदार संजय भेगडे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी आणि आरोग्य शिबिरासाठी आदिवासी बांधवांनी उपास्थित राहावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद आणि समन्वयक गणेश गावडे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)