आंबी-मंगळूर रस्ता नागरिकांसाठी बिकट

वडगाव-मावळ – औद्योगीक क्षेत्र आंबी गावच्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. अंधारीच्या ओढ्यावरील पुलाजवळ सांडपाण्याचा तलाव झाल्याने येथे अपघाताला निमंत्रण मिळते. इंद्रायणीवरील धोकादायक पुलावरून सर्रास अवजड वाहतूक सुरू आहे. एखादा गंभीर अपघात झाल्यावरच सार्वजिक बांधकाम विभागाला जाग येणार का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. आंबी रस्त्याची तसेच धोकादायक पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विद्यार्थी, कामगार, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी व नागरिकांची वर्दळ सुरु असते. दुषित पाण्याने रस्ता चिखलमय व निसरडा झाल्याने ये-जा करताना दुचाकी, चार चाकी वाहने घसरून अपघात होवून अनेक वाहन चालक किरकोळ व गंभीर जखमी झाले.

रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेली खडी वाहनांमुळे पादचाऱ्यांना लागून ते जखमी होत आहे. याशिवाय वाहनांमुळे अंगावर डबक्‍यातील दुषित पाणी उडते. धुळीने दुचाकी व पादचाऱ्यांना ये-जा करणे धोक्‍याचे आहे. आंबी-मंगरूळ चौकात जल वाहिनी फुटून पाणी एमआयडीसीच्या रस्त्यावर गतिरोधकाजवळ साचत असल्याने तेथे वारंवार अपघात होतात. रस्त्याच्या साईटपट्ट्या खचत आहे. ग्रामपंचायत सांडपाण्यावर प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीत सोडते. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून नव्याने पुलाचे बांधकाम करण्याची मागणी माजी उप नगराध्यक्ष गणेश काकडे, सोमा भेगडे, रामनाथ घोजगे, विक्रम कलावडे, दत्ता कानकुडे, प्रा. सुरेश घोजगे, संतोष घोजगे यांनी केली आहे.

धोकादायक पुलावरील बंदी नावालाच?
रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीच्या पूल दुर्घटनेच्या धर्तीवर आंबी येथील इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक ठरवून 30 ऑगस्ट 2016 पासून अवजड वाहतुकीस बंदी केवळ नावालाच असून सर्रास अवजड वाहतूक सुरू आहे. केवळ निकृष्ट दर्जाचे काम होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)