आंबी – खालसा शिवारात वाहनांच्या बॅटऱ्यांची चोरी

संगमनेर- संगमनेर तालुक्यातील आंबी-खालसा येथे रात्रीच्या सुमारास पाच वाहनांच्या सहा बॅटऱ्यांची  चोरी झाल्याची घटना घडली आहे.या वाहनांमध्ये ट्र्क, ट्रॅकटर अशा वाहनांचा समावेश आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आंबी खालसा शिवारातील दत्त मंदिर परिसरात राहणाऱ्या मनोज ज्ञानदेव भोर, मयूर संजय भोर, पराग विजय भोर, रमेश मारुती सोनावणे  यांच्या मालकीच्या  ट्रॅकटरच्या  चार बॅटऱ्या आणि गणपीर दरबार परिसरातील अमीन पटेल यांच्या बाराटायर ट्रकच्या दोन बॅटऱ्या रात्रीच्या सुमारास  अज्ञात चोरट्यांनी  चोरून नेल्या. सकाळी  या वाहनांच्या बॅटऱ्या चोरीस गेल्याचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी त्यांनी घारगाव पोलिसांना कळवले असता पोलिसांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असल्याचे मनोज भोर यांनी सांगितले. मात्र याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)