आंबी खालसात बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी

संगमनेर: संगमनेर तालुक्‍यातील आंबी खालसा येथील शेतकरी पिता-पुत्र पिकला पाणी भरून घराकडे परतत होते. त्यावेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात एकजण किरकोळ जखमी झाला. ही घटना आज (दि. 6) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.

आंबी खालसा येथील रहिवासी नामदेव नाना पानसरे व त्यांचा मुलगा गणेश नामदेव पानसरे हे आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कान्होरे मळा परिसरातील शेतात कांद्याला पाणी भरून मोटारसायकलवरून घराकडे परतत होते. त्यावेळी शेतात दबाधरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढविला. त्यात गणेश पानसरे यांला बिबट्याने पंजा मारल्याने त्यांच्या मांडीला किरकोळ जखम झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुदैवाने मोटारसायकलवर असल्याने दोघेही पिता-पुत्र बचावले. त्यांना वनविभागाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे. या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. अनेक वेळा शेळ्या, कुत्रे बिबट्याचे भक्ष्य बनले आहेत. वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी उपसरपंच सुरेश कान्होरे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)