आंबीमध्ये काकडा आरतीची काल्याने सांगता

तळेगाव एमआयडीसी – येथील आंबी गावामध्ये दररोज पहाटे 4 ते सकाळी 7 काळात काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आरती गवळणी म्हणून देवाला अभिषेक घातला जातो. या वेळी गावातील महिला वर्ग उपस्थित होते.

या सोहळ्याची सांगता काल्याचा कीर्तनाने झाली. शुक्रवारी (दि. 23) ह. भ. प. अर्जुन महाराज शिंदे (भागवताचार्य) यांचे सुश्राव्य असे कीर्तन रात्री 9 ते 11 या वेळेत आयोजित करण्यात आले होते. शनिवारी (दि. 24) काल्याचे कीर्तन ह.भ.प. शंकर महाराज मराठे यांचे कीर्तन झाले. त्यानंतर इंद्रायणी नदीवर जाऊन गंगेची आरती करण्यात आली. संपूर्ण गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. शेवटी आरती घेऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

-Ads-

या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील गावामधील अनेक भक्‍तगण उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमासाठी कारभारी बबनराव घोजगे, तंटामुक्‍ती अध्यक्ष रामनाथ घोजगे, गणेश घोजगे, प्रा. सुरेश घोजगे, चंद्रकांत घोजगे, नानासाहेब घोजगे, बाबासाहेब घोजगे, उपाध्यक्ष दत्तात्रय घोजगे, प्रेमानंद गायकवाड, समाजभूषण धोंडिभाऊ घोजगे, विष्णू दरेकर, गोविंद घोजगे, नामदेव घोजगे, जगन घोजगे, भरत घोजगे, उपसरपंच रवींद्र घोजगे, शामराव घोजगे, विणेकरी सोपान दरेकर, यांनी विशेष परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)