“आंबा’प्रकरणी संभाजी भिडे यांना जामीन 

नाशिक: “आंबे खाल्याने मुले होतात’ या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संभाजी भिडे यांना अखेर दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने संभाजी भिडेंना 15 हजार रुपयांचा जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर संभाजी भिडे यांच्याविरोधात सुनावणी सुरु होती. या आधी 4 सुनावणीच्या वेळी संभाजी भिडे हे अनुपस्थित राहिले होते. कोर्टाने वारंवार हजर राहण्याचे आदेश देऊनही अनुपस्थित राहणाऱ्या भिडे यांनी आज आपली बाजू मांडली.
“माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते,” असा अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केला होता. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केले होते.
भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केले होते. पण यावेळी आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले होते. हे आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला होता.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)