उरुळी कांचन – पुरंदर तालुक्‍यात दुष्काळी परिस्थितीवर मात करून येथील वसतिगृहातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत करावी, असे मत शिवसेना हवेली उपतालुका प्रमुख विजय बगाडे यांनी केले. आंबळे (ता. पुरंदर) येथील सार्थक वसतिगृहातील विद्यार्थ्यांना धान्यवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीकांत मेमाणे, सचिन कांचन, प्रसाद कुंजीर, चंद्रकांत कुंजीर, पेठ गावचे सूरज चौधरी, कांतीलाल गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)