आंबराई पाझर तलावाच्या दुरुस्तीमुळे पाणीसाठ्यात वाढ

गराडे-भिवरी (ता. पुरंदर) येथील आंबराई पाझर तलावात साधारण एप्रिल अखेरपर्यंत तलावात पाणी साठा असतो. पण तलावाला गळती असल्यामुळे तो कोरडा पडत होता. आता या मजबूतीकरणाच्या कामाला 24 लाख रुपये मंजूर झाले असून या माध्यमातून याची गळती थांबून आणखी पाणीसाठ्यात वाढ होईल, याचा फायदा येथील शेतपिके, फळबाग वाढीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी होईल, असे पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय काळे यांनी सांगितले.
भिवरी (ता. पुरंदर) येथील आंबराई पाझर तलावाच्या भरावाची दुरुस्ती, मजबुतीकरण तसेच पिचिंग अशा जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या वतीने 24 लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब घाटे यांचे हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी काळे बोलत होते. यावेळी सरपंच लताताई भिसे, उपसरपंच भाऊसाहेब कटके, तलाठी सुधीर बडधे, ग्रामसेवक अविनाश निगडे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्‍टर हरिभाऊ लोळे, नाथाभाऊ कटके, जालिंदर वाडकर, सखाराम कटके, किरण कटके, तानाजी कटके, शिवाजी पवार, बाबाजी घिसरे, मोहन गायकवाड, अनिल ढवळे, रामदास कटके, महादेव फडतरे, भरत गायकवाड, पोपट दळवी, सचिन दळवी, नानासाहेब दळवी, गुलाब दळवी, संदीप कटके आदी उपस्थित होते.
भिवरी (ता. पुरंदर) येथील आंबराई पाझर तलावाचे काम माजी आमदार संभाजी कुंजीर यांच्या काळात 1982 साली पूर्ण झाले. आंबराई पाझर तलावाच्या दुरुस्ती मजबुतीकरणामुळे पुढील 25 वर्षे परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे पुरंदरचा पश्‍चिम भागाचा चांगला फायदा झाला आहे. जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून या विकास योजना राबविण्यात येत असल्याचे माजी सभापती दादासाहेब घाटे यांनी सांगितले. या तलावाखाली व आजुबाजूला साधारण 15 विहीरी व 10 विंधन विहीरी आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे सरपंच लताताई भिसे व उपसरपंच भाऊसाहेब कटके यांनी सांगितले.
आंबराई पाझर तलावाच्या दुरुस्ती व मजबूतीकरणाचे काम मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे गव्हर्मेंट कॉंन्ट्रक्‍टर हरिभाऊ लोळे यांनी सांगितले. प्रास्तविक अनिल ढवळे यांनी केले. महादेव फडतरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)