आंबट-गोड बोरांचा हंगाम अंतिम टप्प्यात

आवक घटली : भावात 20 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढ
पुणे – आंबट, गोड चवीच्या बोरांचा हंगाम अंतिम टप्प्यात झाला आहे. बोरांची आवक घटत चालली असून, रविवारी मार्केट यार्डात 250 गोणी आवक झाली. त्या तुलनेत अधिक असल्याने बोरांच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 20 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी प्रवीण शहा यांनी दिली.
सध्या बाजारात सोलापूर जिल्ह्यातील कोणेरी, अंगर, आष्टी, पापरी परिसरातून आवक होत आहे. ख्रिसमस, नवीन वर्ष स्वागत, त्यानंतर सक्रांतीपर्यंत बोरांना अधिक मागणी होती. त्यावेळी मार्केट यार्डात दररोज 3 ते 4 हजार गोणी आवक होत होती. मात्र, आता हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे मार्केट यार्डात बोरांची आवक कमी होत आहे. रविवारी अवघी 250 गोणी गोणी आवक झाली. ही आवक कमी आहे. त्या तुलनेत शहर, सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर, गोवा, लोणावळा आदी परिसरातून बोरांना मागणी वाढली आहे. त्यामुळे मार्केटयार्डात चण्यामण्या, उमराण, चमेली, चेकनट, ऍपल बोर आदी विविध जातींच्या बोराच्या भावात वाढ झाली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात आवक आणखी कमी होण्याचा अंदाज शहा यांनी वर्तविला आहे.
———————-
बोरांचा प्रकार भाव (प्रति दहा किलो)
चमेली 100 ते 140 रुपये
उमराण 30 ते 50 रुपये
चेकनट 350 ते 450 रुपये
चण्यामण्यास 400 रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)