आंध्र प्रदेश : विशेष राज्यासाठी आज काय निर्णय?

हैदराबाद : आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्य असा दर्जा मिळण्यासाठी तेलगु देसम पक्षाने केंद्र सरकारमधून काडीमोड घेतला. त्यानंतर रालोआ अर्थात भाजपप्रणीत आघाडीतूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पडद्यामागे मोठ्या हालचाली घडत आहेत. त्यात चंद्राबाबू नायडू यांनी सर्वपक्षीय बैठक घेण्याचे ठरवले आहे.

केंद्र सरकारने आंध्रला विशेष राज्याच्या दर्जाऐवजी पॅकेज देण्याचा निर्णय घेतला होता. यावर नाराज झालेल्या चंद्राबाबू नायडू यांनी मोठा निर्णय घेत आपली नाराजी जाहीर केली. दरम्यान, आता राज्याला विशेष दर्जा मिळावा यासाठी चंद्राबाबू यांनी ‘पॉलिटिकल डिप्लोमसी’चे आयोजन केले आहे. याबाबत ते सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत काय ठरते, याबबत उत्सुकता लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)