आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट; 10 ठार

अमरावती – आंध्र प्रदेशातील एका दगडाच्या खाणीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असुन 4 जण जखमी झाले आहेत. कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत हा स्फोट झाला. दरम्यान खाणीत काम करणाऱ्या 10 कामगारांचा मृत्यू झाला. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच अलुरु सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी पोलीस, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.

या घटनेबद्दल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. स्फोटातील जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठीचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. हा स्फोट नेमका का झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच विरोधी पक्षनेते एस. जगनमोहन रेड्डी आणि जनसेना पार्टीचे प्रमुख पवन कल्याण यांनी दु: ख व्यक्त केले आणि शोकग्रस्त कुटुंबांना सहानुभूती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)