आंध्रात पावसामुळे मंडप कोसळून चार भाविकांचा मृत्यू

चंद्राबाबू पोहचण्यापूर्वी घडली दुर्घटना
अमरावती – आंध्रप्रदेशात सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे एका प्राचीन राम मंदिराच्या परिसरातील मंडप कोसळून 4 भाविक मृत्युमुखी पडले, तर सुमारे 50 जखमी झाले. आंध्रचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबूू नायडू यांचे आगमन होण्यापूर्वी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

कडपा जिल्ह्यातील ओंटीमीट्टामध्ये असणाऱ्या मंदिरात रामनवमीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यावेळी पाऊस आणि वाऱ्यामुळे मंडप कोसळला. अशातच वीज गेल्याने गोंधळात भर पडून चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली. मंडपाचा काही भाग अंगावर कोसळून दोन भाविक मृत्युमुखी पडले.

एक महिला हृदयविकाराच्या झटक्‍याने मरण पावली. तर आणखी एक भाविक वीजेच्या शॉकने दगावल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुर्घटनेनंतर रात्री उशीरा एक मृतदेह सापडला. नंतर सोहळ्यासाठी उपस्थित असलेले हजारों भाविक निघून गेल्यानंतर उर्वरित मृतदेह आढळले. जखमी भाविकांना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, चंद्राबाबू मंदिरातील सोहळ्याला उपस्थित राहिले. नंतर त्यांनी रूग्णालयात जाऊन जखमी भाविकांची विचारपूस केली. मृत भाविकांच्या कुटूंबीयांना त्यांनी प्रत्येकी 15 लाख रूपयांची मदत जाहीर केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)