आंध्रप्रदेशात विजांचा थयथयाट; १३ तासांत कोसळल्या ३७ हजार विजा

हैदराबाद : पाऊस पडताना किंवा सोसाट्याचा वारा सुरू असताना साधारणपणे विजांचा गडगडाट होतो. कधीकधी विजा कोसळतात. मात्र आंध्रप्रदेशात मागील मंगळवारी अनोखी नैसर्गिक आपत्तीची नोंद झाली आहे. राज्याच्या उत्तर किनारपट्टी भागात अवघ्या १३ तासांत तब्बल ३६ हजार ७४९ वेळा विजा कोसळल्या. यात सुमारे ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

याबद्दल राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने माहिती दिली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी मे मध्ये ३० हजार विजा कोसळल्या होत्या. त्यावेळीही मोठे नुकसान झाले होते. मात्र यावर्षी हा आकडा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. याबद्दल आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले, की उत्तर किनारपट्टी भागात १५ ते १६ किमी लांबीचे ढग तयार होतात. यावर्षी हे प्रमाण दुपटीने वाढले आहे. यावर्षी हे ढग ३० किमी लांबीचे होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)