आंध्रप्रदेशपाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला बंदी 

नवी दिल्ली – आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांच्यापाठोपाठ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारला मोठा झटका दिला आहे. पश्चिम बंगाल सरकारनेही राज्यातील कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करण्यास केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील तपाससंस्था असलेल्या सीबीआयला निर्बंध घातले आहेत. राज्य सचिवालयाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

ममता बॅनर्जींनी की, चंद्राबाबू नायडू यांनी योग्य निर्णय घेतला आहे. भाजप आपल्या राजकीय फायद्यासाठी सीबीआय तसेच अन्य यंत्रणांचा उपयोग करत आहे, असा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे.

-Ads-

दरम्यान, आंध्रप्रदेश सरकारने शुक्रवारी दिल्ली विशेष पोलीस दलाला दिलेली संमती रद्द केली आहे. आता यापुढे सीबीआयच्या अधिका-यांना आंध्रप्रदेशमध्ये प्रवेश जरी करायचा असल्यास सरकारची मंजुरी घेण्याची आवश्‍यकता राहणार आहे. तसेच राज्य पोलिसांनी सीबीआयला कोणतेही सहकार्य करू नये, असे आंध्र सरकारने आदेशात म्हटले आहे. आंध्रच्या सरकारने तपास संस्थेच्या अधिका-यांना ही नोटीस पाठविली आहे. यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार समोरासमोर आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)