आंध्रच्या मागण्यांविषयी केंद्र सरकार इतके ताठर का?

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा सवाल
अमरावती – आंध्रप्रदेशच्या रास्त मागण्यांविषयी केंद्र सरकारने इतकी ताठर भूमिका कशासाठी घेतली आहे असा सवाल त्या राज्याचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी केला आहे. या ताठरपणा मागे भाजपची नेमकी काय भूमिका आहे हे आकलना पलिकडील आहे असे ते म्हणाले.

ते म्हणाले की आम्ही प्रथम आमच्या दोन मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला. त्यानंतर आम्ही एनडीएतून बाहेर पडलो. आता आम्ही त्यांच्या विरोधात अविश्‍वास ठरावही आणला आहे आणि त्याला चांगला पाठिंबाही मिळत आहे तरीही हे सरकार ढिम्म हलले नाही. या मागे त्यांची भूमिका काय आहे हेच समजेनासे झाले आहे. त्यांच्या या ताठर भूमिकेकडे राज्यातील जनता पहात आहे आणि या सगळ्या घडामोडींची त्यांना जाण आहे. आंध्रप्रदेशच्या रास्त मागण्यांकडे साफ दुर्लक्ष करण्याच्या त्यांच्या आत्मविश्‍वासाचा मूळ स्त्रोत शोधायला हवा असेही ते म्हणाले.

तेलंगणा राज्य आमच्यापासून वेगळे काढल्यानंतर आमचे राज्य प्रगती आणि विकासाच्या बाबतीत 20 वर्ष मागे गेले आहे. ही गॅप भरून काढण्यासाठी केंद्र सरकार आम्हाला कशी मदत करणार आहे हे त्यांनी समजाऊन सांगायला पाहिजे. त्यांनी आजवर आम्हाला जे काही दिले आहे ते इतके अत्यल्प आहे की त्यातून आमची ही 20 वर्षांची गॅप भरून निघणार नाहीं. राज्याचे विभाजन करताना जो कायदा संमत झाला आहे त्यातील 19 महत्वाच्या बाबी अपुर्ण राहिल्या आहेत त्याची पुर्तता झालीच पाहिजे यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत असे नमूद करून त्यांनी पक्षाच्या खासदारांना संसदेत आग्रही राहण्याच्या सूचनाही केल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)