आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू वाढदिवशी करणार उपोषण

राज्यातील समस्यांवरून निशाण्यावर मोदी सरकार
अमरावती – राजकीय क्षेत्रातील उपोषणांचे सत्र कायम आहे. कॉंग्रेस आणि भाजपपाठोपाठ आता आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनीही लाक्षणिक उपोषणाचा इरादा जाहीर केला आहे. मोदी सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी चंद्राबाबू स्वत:च्या वाढदिवशी (20 एप्रिल) उपवास करणार आहेत.

मोदी सरकार आंध्रला योग्य वागणूक देत नसल्याचा चंद्राबाबूंचा आरोप आहे. आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने काही दिवसांपूर्वी चंद्राबाबूंच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पक्ष (टीडीपी) केंद्रातील सत्तारूढ आघाडीमधून (एनडीए) बाहेर पडला. त्यानंतर चंद्राबाबू आणि टीडीपीने मोदी सरकारच्या विरोधातील आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे.

आता चंद्राबाबूंनी आंध्रच्या समस्यांबाबत मोदी सरकारने स्वीकारलेल्या धोरणाचा निषेध करण्यासाठी उपवास करण्याचे ठरवले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत आंध्रातील सर्व 25 जागा जिंकण्यासाठी टीडीपीच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर टीडीपी पुन्हा एकदा किंग मेकर ठरेल. केंद्रात पुढील सरकार कुणाचे आणि पंतप्रधानपदी कोण हे निर्णय टीडीपीवर अवलंबून असतील, असा दावाही त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)