आंध्रचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी कॉंग्रेसमध्ये परतणार

अमरावती – आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री नल्लारी किरणकुमार रेड्डी यांचे स्वगृही म्हणजे कॉंग्रेसमध्ये परतणे निश्‍चित झाले आहे. ते दिल्लीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. त्या भेटीनंतर रेड्डी यांच्या कॉंग्रेसमधील फेरप्रवेशाची औपचारिकता पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

किरण रेड्डी संयुक्त आंध्रप्रदेशचे अखेरचे मुख्यमंत्री ठरले. आंध्रच्या विभाजनाचा निषेध करत त्यांनी फेब्रुवारी 2014 मध्ये मुख्यमंत्रिपद सोडले. तसेच, कॉंग्रेसलाही रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. मात्र, त्यांचा पक्ष 2014 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत कुठलाच प्रभाव पाडू शकला नाही. त्यानंतर चार वर्षे रेड्डी सक्रिय राजकारणापासून दूरच राहिले. माजी क्रिकेटपटू असणारे रेड्डी दरम्यानच्या काळात गोल्फ खेळाकडे वळले.

आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने ते पुन्हा सक्रिय होतील, असे संकेत मिळत होते. ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशाही अटकळी बांधल्या जात होत्या. मात्र, मागील काही महिन्यांपासून कॉंग्रेस नेतृत्वाकडून त्यांच्याशी संपर्क साधला जात होता. स्वगृही परतण्याबाबत त्यांचे मन वळवण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना अखेर यश आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)