आंधळगावात 176 बालकांना लसीकरण

मांडवगण फराटा- निमोणे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नागरगाव व आंधळगाव (ता. शरूर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने 0 ते 5 वयोगटातील सुमारे 176 बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यात आला, अशी माहीती आरोग्यसेविका अर्चना खटके यांनी दिली. याप्रसंगी आंधळगाव येथील पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ सरपंच नंदकुमार दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्यसेविका अर्चना खटके, आशा स्वयंसेविका मुमताज शेख, पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर निमोणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत दरेकर उपस्थित होते. शिरुरचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी आरोग्य उपकेद्रांला भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)