आंदोलन तीव्र करण्याचा बॅंक कर्मचाऱ्यांचा इशारा

चेन्नई – केवळ दोन टक्के वेतनवाढीच्या प्रस्तावाबाबत नाराजी व्यक्त करत बॅंक कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी दोन दिवसीय संप केला. आता त्यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

बॅंक कर्मचाऱ्यांनी 30 आणि 31 मे यादिवाशी देशव्यापी संप केला. त्यामुळे दोन दिवस सार्वजनिक बॅंकांचे कामकाज ठप्प झाले. आता आंदोलन आणखी पुढे नेण्याच्या उद्देशाने युनायटेड फेडरेशन ऑफ बॅंक युनियन्सची (यूएफबीयू) आज येथे बैठक झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

योग्य वेतनवाढ मिळावी या मागणीसाठी आमचे प्रतिनिधी केंद्र सरकार आणि बॅंकांच्या उच्चपदस्थांची भेट घेतील. त्या भेटींमधून तोडगा न निघाल्यास आम्ही आणखी संप करू, असे यूएफबीयूने म्हटले. बॅंक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांची मिळूून यूएफबीयू बनली आहे. दरम्यान, नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ बॅंक एम्पॉईज या संघटनेने विविध मागण्यांसाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत टप्प्याटप्प्याने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे वेतनवाढीच्या मुद्‌द्‌यावरून बॅंक कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)