आंदोलनाशिवाय राज्यसकार काही देत नाही

सोमेश्‍वरनगर- पंतप्रधान तरूणांना रोजगार देऊ शकले नाहीत आणि राज्यसरकार आंदोलन केल्याशिवाय सहजपणे काही देत नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
बारामती तालुक्‍यातील वाघळवाडी, वाणेवाडी, मुरूम, गडदरवाडी, खंडोबाचीवाडी, निंबूत या गावांमध्ये पार पडलेल्या सभेत त्या बोलत होत्या. प्रत्येक गावात त्यांनी लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच झालेल्या कामांचा आढावाही घेतला. यानिमित्ताने सोमेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, राजवर्धन शिंदे, लक्ष्मण गोफणे, वसंत मदने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, नीता फरांदे, मेनका मगर, बापू धापटे आदी उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पंतप्रधानांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ असे आश्‍वासन दिले होते; परंतु त्यांना पाळता आले नाही. राज्यसरकारही लोकांच्या भावना समजून घेत नाही. भयानक परिस्थिती निर्माण झाल्यावरच ते ऐकत आहेत. दुधाचे आंदोलन केल्यावरच दुधाला भाव मिळाला. तसेच साखरेलाही चांगला भाव नव्हता. सोमेश्‍वरनगर परिसरातसुद्धा अंगणवाड्यांना वीज आणि पाणी या सुविधा नाहीत. जिल्हा परिषद शाळांकडेच लक्ष दिले जाते. लोक अंगणवाड्यांकडे दुर्लक्ष करतात आणि मोबाईल टॉवर व हायमास्टची मागणी करतात, असे त्यांनी नमूद केले.

  • एकही मूल शालाबाह्य राहणार नाही
    बारामती लोकसभा मतदारसंघात एकही मूल शालाबाह्य राहणार नाही याची काळजी संरपंचांनी व शिक्षण व्यवस्थेने घ्यावी. तसेच एकही अंगणवाडी वीज व पाणी याशिवाय राहणार नाही यासाठी जिल्हा परिषदेच्या सहकाऱ्याने सहा महिन्यांत काम पूर्ण करणार आहे,

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)