आंदोलक युवकांवरील संपूर्ण गुन्हे मागे घावेत:रुपाली पाटील

भगिनींचे आंदोलनस्थळावर ठाण, रोहन तोडकर यांच्या कुटुंबियांची आंदोलनस्थळी भेट
कराड दि. 4 (प्रतिनिधी)
मराठा समाजाने आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरत ऐतिहासिक मुक मोर्चे काढले. त्यानंतर मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात सरकारकडून घोषणा करण्यात आल्याने आंदोलनाचे वादळ काही काळ क्षणले. मात्र, सरकारकडून घोषणाबाजीची कोणतीही पूर्तता न झाल्याने समाजभावनांचा उद्रेक होऊन आंदोलन मुक मोर्च्यावरून ठोक मोर्च्यात परावर्तीत झाले. मराठा आंदोलनाला वेगळी दिशा देत आंदोलन भरकटवण्याचे काम कोण करत आहे याचा शोध घेणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर आंदोलक युवकांवर दाखल करण्यात आलेले सर्वच्या सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आंदोलकांना कठोर गुन्हे करण्यास कोणी भाग पाडले असा सवालही मावळा प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील यांनी उपस्थित केला.
मराठा भगिनींच्या ठिय्या आंदोलनस्थळाच्या भेटीप्रसंगी त्या बोलत होत्या. पाटील म्हणाल्या, मराठा समाजावर कित्येक पिढ्यांपासून अन्याय- अत्याचार होत असून त्याचा उद्रेक झाल्याने समाजबांधवांना रस्त्यावर उतरावे लागले. त्यासाठी त्यांनी शांततेचा मार्ग निवडला असताना शासनाच्या कुचकामी धोरणांमुळे त्यांना आक्रमक भूमिका घ्यायला भाग पाडले. त्यामध्ये राज्यभरातील 1200 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, त्यांना गंभीर गुन्हे करण्यासाठी कोणी भाग पाडले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच कितीही गुन्हे दाखल झाले तरीही मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटू नका असे आवाहनही त्यांनी आंदोलकांना केले आहे.
दरम्यान, ठिय्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आ. आनंदराव पाटील, आ. नरेंद्र पाटील, सारंग पाटील (बाबा), राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, जि. प. सदस्य सागर शिवदास, विक्रम पावसकर, नगरसेवक विनायक पावसकर, राजेंद्र यादव, हणमंत पवार, विजय वाटेगावकर, यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर बुधवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मराठा समाज आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी मराठा भगिनींनी सुरु केलेल्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठींबा मिळत आहे. अनेक लोकप्रतिनिधींसह विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, मंडळांनी आंदोलनस्थळी उपस्थिती दर्शवत या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला आहे. सरकारकडून मराठा आरक्षणासह समाज्याच्या इतर मागण्यांबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेत सलग चौथ्या दिवशीही आंदोलक भगिनींनी आंदोलनस्थळावर ठाण मांडले.

ना. शेखर चरेगावक यांच्या निवास्थानी आंदोलकांची घोषणाबाजी
शहरासह राज्यभरात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने येथील आंदोकलकांनी ना. शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आक्रमक आंदोलकांनी शासनाच्या निषेदार्थ तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांकडून ना. चरेगावकर यांना निवस्थानाबाहेर येण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार ना. चरेगावकर यांनी निवस्थानाबाहेर येत आंदोलकांशी चर्चा केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तोडकर कुटुंबियांना एकूण 88 हजार 800 रुपयांचे धनादेश सुपूर्द
राज्यात उडालेल्या मराठा आंदोलनाच्या भडक्‍यात काही आंदोलकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यामध्ये नवी मुंबई येथे झालेल्या आंदोलनात खोनोली (चाफळ) ता. पाटण येथील रोहन तोडकर या मराठा युवकाला आपले प्राण गमवावे लागल्याने त्यांच्या कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना सहानुभूती म्हणून समाजातील विविध घटकांकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरु झाला आहे. त्यामध्ये कराड येथील आंदोलनस्थळी धैर्यशील कदम यांच्या वर्धनऍग्रोच्या वतीने सत्वशिल कदम यांनी रुपये 25 हजार, शाहीर यादव प्रतिष्ठानच्या वतीने 25 हजार, एमएसईबीच्या कर्मचारी व पदाधिकार्यांकडून 22 हजार 800, विक्रम पावसकर यांच्याकडून 11 हजार तर मराठा समन्वय समिती, मसूरच्या डॉ. चव्हाण यांच्या मातोश्रींच्या हस्ते 5 हजार अशा एकूण 88 हजार 800 रुपयांचे धनादेश रोहन तोडकर यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)