आंदोलकांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा – हिना गावित

नवी दिल्ली – भाजपशासित महाराष्ट्रात भाजपच्या महिला खासदारावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा मुद्या लोकसभेत उचलण्यात आला. नंदूरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी महाराष्ट्र पोलिसांवर भेदभाव करण्याचा आरोप करीत मराठा आंदोलकांवर ऍट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी शून्यप्रहरात केली.

जिल्हा नियोजन मंडळाची बैठक संपल्यानंतर परत जाताना मराठा आंदोलकांनी आपल्या गाडीला चारही बाजूने घेरले. काहीजण गाडीवर चढले आणि काही जणांनी लाथा मारून गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर, एका बाजूच्या आंदोलकांनी गाडी उलटविण्याचा प्रयत्न केला. आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी गाडीतून काढले नसते तर गाडीखाली दबून माझा जीव गेला असता, अशा शब्दांत गावित यांनी कालच्या भीषण घटनेची माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गावित म्हणाल्या की, मी आदिवासी समाजाची महिला खासदार आहे. माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. मात्र, महाराष्ट्र पोलिसांनी दोषींना तुरूंगात डांबण्याऐवजी एफआयआर दाखल करून सोडून दिले. भाजपशासित राज्यात भाजपच्या महिला खासदाराची ही अवस्था असेल तर सामान्य महिलांची स्थिती किती वाईट असेल? याचा अंदाज यावरून घेतला जावू शकतो. यामुळे आंदोलकांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आणि पोलीस अधिक्षकांना निलंबित करण्याची मागणी हिना गावित यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)