आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या

राजगुरूनगर- येथे सोमवारी (दि. 30) सकल मराठा समाज ठोक क्रांती मोर्चानंतर झालेल्या हिंसक घटनेत मराठा समाजाचा संबंध नाही. मात्र, पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. सकल मराठा समाज आंदोलनात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी खेड तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्यावतीने आज (गुरुवारी) पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली.
राजगुरुनगर शहरात सोमवारी सकल मराठा समाज क्रांती ठोक मोर्चा व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते हे आंदोलन शांततेत झाल्यानंतर काही तासांनी शहरात हिंसक कृत्य झाली. पोलिसांवर व काही वाहनांवर दगडफेक करून त्यांचे नुकसान करण्यात आले. खासगी बसला आग लावण्याच्या घटना घडल्या. राजगुरुनगर पोलिसांकडून स्थानिक नागरिकांवर, ज्याचा या हिंसक कृत्यांशी संबध नाही अशा युवकांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचे सकल मराठा समाज समन्वय समितीचे म्हणणे आहे. त्यांनी याबाबत आज पत्रकार परिषद घेवून त्यांची भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला समन्वय समितीचे अंकुश राक्षे, वामन बाजारे, शंकर राक्षे, सुदाम कराळे, ऍड.अनिल राक्षे, ऍड. सुभाष करंडे, शुभम गाडगे, अनिल बारणे, सत्यवान शिंदे उपस्थित होते.
अंकुश राक्षे म्हणाले की, सकल मराठा समाज क्रांती ठोक मोर्चा शांततेत निघाला होता. त्यानंतर पुणे-नाशिक महामार्गावरील रस्तारोको आंदोलन झाले. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन झाले. त्यानंतर सुमारे तीन तासांनी म्हणजे साडेचार ते पाचच्या सुमारास काही हिंसक प्रवृत्तीचे लोक जमा होवून त्यांनी दगडफेक केली. चाकण येथे दगडफेक व वाहनांना आगी लावणारे राजगुरुनगर शहरात आले. त्यांनी हे कृत्य केले आहे. यात सकल मराठा समाज मोर्चात सहभागी झालेले कोणीही नव्हते. मात्र राजगुरुनगर पोलिसांनी मोर्चातीलच सुमारे 200 ते 250 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मोर्च्यातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार नसल्याचे आश्‍वासन देवूनही पोलीस गुन्हे दाखल करीत आहेत. पोलिसांनी खात्री करून कारवाई करावी. दगडफेक आणि जाळपोळ करणारे खऱ्या आरोपींचा शोध घ्यावा, मगच गुन्हे दाखल करावेत. या गुन्हात निरपराध व्यक्‍तींचा समावेश करून नये.

  • निरापराध्यांचे खटले मोफत लढविणार
    या घटनेत पोलिसांनी निरपराध युवकांवर गुन्हे दाखल करू नयेत. सकल मराठा समाज मोर्चात सहभागी असलेल्या निरपराध युवकांवरील सर्व न्यायालयीन खटले मोफत लढविण्यात येतील. पोलिसांची महाविद्यायीन विद्यार्थ्यांवर पोलिसांचा मोठी दहशत बसली आहे. दगडफेक करण्यात त्यांचा संबंध नसूनही पोलीस त्यांना त्रास देत आहेत. ते चुकीचे आहे, अशी माहिती ऍड. अनिल राक्षे, ऍड. सुभाष करंडे यांनी दिली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)