आंदोलकांचे प्रांताधिकार्‍यांना गाजर

कराड, दि. 7 (प्रतिनिधी) -मराठा आरक्षणासाठी महिलांचे गेल्या सात दिवसांपासून येथील दत्त चौकात ठिय्या आंदोलन सुरू असून मंगळवारी 13 मराठा बांधवांनी मुंडण करून आणि आंदोलक महिलांनी प्रांताधिकार्‍यांना गाजर देवून शासनाचा निषेध केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या एकमुखी मागणीसाठी मंगळवारी येथील दत्त चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मराठा समाज बांधवांनी आपले मुंडण केले. तसेच शासनाचा तीव्र निषेध नोंदविला. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मराठा बांधवांनी आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी केली. तेरा मराठा बांधवांनी मुंडण करून शासनाचा तीव्रपणे निषेध नोंदविला, तर आंदोलनस्थळी आलेल्या प्रांताधिकार्‍यांना महिलांनी गाजर देत शासनाचा अनोख्या पध्दतीने निषेध नोंदविला. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)