आंदर मावळ येथील नागरिकांना विविध शासकीय दाखल्याचे वाटप

वडगाव मावळ- सुवर्ण जंयती महाराज अभियाना अंतर्गत विस्तारित समाधान योजने’तर्फे आमदार संजय बाळा भेगडे यांच्या हस्ते आंदर मावळ येथील नागरिकांना विविध शासकीय दाखल्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात आंदर मावळ परिसरातील सावळा, खांडी, निळशी, वडेश्वर, कशाळ, भोयरे, कोडींवडे, नवलाख उंब्रे, कदमवाडी, वाहनगाव, ठाकरवस्ती या भागातील आदिवासी बाधवांना रेशन कार्ड, संजय गांधी योजना, जातीचे दाखले, अपंगत्वाचा दाखला, मोफत एस टी पास, निवडणूक ओळखपत्र अशा विविध प्रकारचे शासकीय दाखले मुळ कागदपत्रांची पडताळणी करून देण्यात आले. या कार्यक्रमात एक हजार लाभार्थीनी सहभाग घेतला होता. बाळा भेगडे म्हणाले की,””आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय दाखले मिळवण्यासाठी शहराच्या ठिकाणी जाऊन पायपीट करावी लागते. या नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी शिबीराचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमप्रसंगी तहसिलदार रणजीत देसाई, भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती शांताराम कदम, गट विकास अधिकारी शरद माळी, सर्कल अधिकारी बोरकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किरण राक्षे, गणेश भेगडे, संदीप काकडे, गणेश कल्हाटकर, रोहिदास असवले, गणेश भांगरे, कुंडलीक खांडभोर, काळुराम घोजगे, अमोल भोईरकर, सुरेश आलम, सचिन पांगारे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)