आंदर-मावळ मधील गणेशोत्सव मंडळांना आमदार बाळा भेगडे यांची भेट

टाकवे बुद्रुक, (वार्ताहर) – गणेशोत्सवानिमित्त मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे व मावळ तालुका पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळस्कर यांनी टाकवे बुद्रुक व आंदर मावळमधील सर्व गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणेशोत्सव शुभेच्छा दिल्या.

उपसभापती शांताराम कदम, टाकवे वडेश्‍वर गणाचे अध्यक्ष रोहिदास असवले. ज्येष्ठ नेते गुलाब जाभुंळकर, टाकवे शहर अध्यक्ष दत्ता असवले, चेअरमन राजुशेठ शिंदे, शालेय समिती अध्यक्ष ऋषीनाथ शिंदे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत शिंदे व पदाधिकारी उपस्थितीत होते. भेटीत संत रोहिदास महाराज मंडळाकडून सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संतोष आंबेकर, सोपान जगताप, संतोष जगताप, चिंधु जगताप, अमोल आबेकर, सोमनाथ जगताप, राजू जगताप, संदीप भालेराव, महेश असवले आदी उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)