आंदर मावळातील माती उत्खनन ठरु लागले डोकेदुखी

टाकवे बुद्रुक – आंदर मावळ डोंगराळ भागातील पायथ्याशी दिवसरात्र उत्खनन होत आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मरुम वाहतूक या ठिकाणी सुरु असते. टाकवे कान्हे भागात नवीन औद्योगिक बांधकामाचे काम जलद गतीने चालू आहे येथील जमीन सपाटीकरणासाठी हा मुरूम वापरला जात आहे. सर्रास सुरू असलेल्या या उत्खननामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. तसेच स्थानिक नागरिकांना उत्खनन आणि मरुम वाहतुकीमुळे सतत उडत असलेल्या धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मुरुम वाहतुकीमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. आंदर मावळमध्ये जाण्यासाठीचा हाच एक मुख्य रस्ता आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेवरील बाजूस टाकवे गावची मुख्य बाजारपेठ आहे, हे ठिकाण सतत वर्दळीचे असल्यामुळे दर 10 मिनिटांनी येथे वाहतूक कोंडी होताना दिसते. वाहतूक कोंडीमुळे येथील व्यापारी त्रस्त झाले आहेत.

व्यवसायांवरही परिणाम
सततच्या वाहतुकीमुळे येथे कायमच धुळीचे वातावरण असते. मातीचे कण उडत असल्याने भाजी विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. कित्येक व्यावसायिकांनी सांगितले की धुळीमुळे अन्नपदार्थ आणि भाज्या घाण होत आहेत आणि ग्राहक कमी होऊ लागले आहेत. दिवसें-दिवस रोजच्या व्यवसायावर या उत्खननचा विपरीत परिणाम प्रकर्षाने जाणवत आहे. धूळ जमिनीवर बसावी म्हणून दुकानदारांना आता थोड्या-थोड्या वेळाने रस्त्यावर पाणी मारावे लागत आहे. पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यालाही भेगा गेल्या आहेत.

मातीची वाहतूक थांबविण्याची मागणी
स्थानिक नागरिकांकडून व व्यवसायिकांकडून यावर उपाय म्हणून दिवसा होणारी मातीच्या वाहतूक पुर्णपणे थाबवावी अशी मागणी करण्यात येत आहे. मुरुम वाहतुकीमुळे होत असलेल्या त्रासाला थांबविण्यासाठी ही वाहतूक दिवसा थांबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. परंतु सध्यातरी या मागणीला प्रशासनाकडून दाद मिळताना दिसत नाही. यासंबंधी सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही.

उत्खनन वैध की अवैध
या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी हे उत्खनन वैध आहे की अवैध? तसेच माती उत्खननावेळी रॉयल्टी जमा केली आहे का? यामुळे होणाऱ्या प्रदूषणासाठी कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत यांची माहिती सर्वसामान्य जनतेला कळविण्यात यावी अशी मागणी नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांच्याकडे निवेदना मार्फत केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)