आंतर चार्टर्ड अकौंटंट फर्म क्रिकेट स्पर्धा; स्टॅलियन्स इलेव्हन संघाला विजेतेपद

पुणे- पाचव्या प्रोमोड करंडक आंतर चार्टर्ड अकौंटंट फर्म क्रिकेट स्पर्धेत स्टॅलियन्स इलेव्हन संघाने कीर्तने पंडित इलेव्हन संघाचा अखेरच्या चेंडूवर पराभव करून विजेतेपद संपादन केले. “आयसीएआय’च्या पश्‍चिम विभागीय पुणे शाखेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

कटारिया हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कीर्तने पंडित संघावर एका धावेने रोमहर्षक विजय मिळवताना स्टॅलियन्स संघाने विजेतेपद पटकावले. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्टॅलियन्स इलेव्हन संघाने 10 षटकांत 6 गडी गमावून 72 धावा केल्या. तसेच त्यांनी कीर्तने पंडित इलेव्हनचा डाव 10 षटकांत 8 गडी बाद 71 धावांवर रोखून रोमांचकारी विजयाची नोंद केली.

-Ads-

त्याआधी साहिल पारख (15 धावा), सिध्दार्थ खिंवसरा (21), आयुश तिवारी (13) व अजय सुब्रमण्यम (14) यांनी छोट्या पण महत्वपूर्ण धावा करून स्टॅलियन्स संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. विजयासाठी 73 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कीर्तने पंडित इलेव्हन संघाची आघाडीची फळी झटपट बाद झाली. तरीही अभिषेक मराठे (नाबाद 28), आकाश कक्कर (18) व मिथुन भोईटे (10) यांच्या फलंदाजीच्या जोरावर त्यांनी आपल्या संघाचे आव्हान कायम ठेवले.

अखेरच्या दोन षटकांत 22 धावा व त्यानंतरच्या अंतिम षटकांत 10 धावा असे समीकरण तयार झाले. स्टॅलियन्सच्या अभिषेक अगर या मध्यमगती गोलंदाजाने या षटकात टिच्चून मारा करताना पहिल्या चार चेंडूंत केवळ 5 धावा दिल्या. पाचव्या चेंडूवर कीर्तने पंडित संघाच्या विशाल पवार याने एक धाव घेतली व दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला.

अखेरच्या चेंडूवर जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्‍यकता असताना कीर्तने पंडित संघाचा सुशांत कारभारी याने फटकावलेल्या चेंडूवर दोन धावा निघाल्या, ज्यामध्ये एक शॉर्ट-रन होती व तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात सुशांत धावबाद झाला व स्टॅलियन्स संघाने एका धावेने सनसनाटी विजय मिळवला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण ऑडी पुणेचे विपणन सरव्यवस्थापक चंदन लाड, डीसीबी बॅंकेचे विभागीय प्रमुख किरणबाबू नेलापट्टी आणि प्रोमोडचे संचालक निखिल निकम यांच्या हस्ते झाले. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक आणि रोख पारितोषिके देण्यात आली. या बरोबरच स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली. यामध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज निपुण शानदारी (डीकेजे वॉरियर्स, 246 धावा), सर्वोत्कृष्ट गोलंदाजी चिन्मय जोशी (सीए चॅलेंजर्स, 9 विकेट), सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक गोपाल जाजू (रॉयल्स) आणि मालिकावीर साहिल पारख (स्टॅलियन्स) या पारितोषिकांचा समावेश होता.

सविस्तर निकाल –

अंतिम फेरी – स्टॅलियन्स इलेव्हन – 10 षटकांत 6 गडी बाद 72 धावा (साहिल पारख 15, सिद्धार्थ खिंवसरा 21, आयुश तिवारी 13, अजय सुब्रमण्यम 14, लक्ष्मण वाघमोडे 2-8, अमोद बेंद्रे 2-22, अभिषेक मराठे 1-13) वि.वि. कीर्तने पंडित इलेव्हन – 10 षटकांत 8 गडी बाद 71 धावा (अभिषेक मराठे नाबाद 28 (12, 3 चौकार, 2 षटकार), आकाश कक्‍कर 18, मिथुन भोईटे 10, आयुष तिवारी 2-17, आदित्य दाते 1-4); सामनावीर – अभिषेक मराठे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)