आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत सिंहगड स्प्रिंगडेल प्रशालेच्या साईआर्या काटकरला विजेतेपद

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सिंहगड स्प्रिंग डेल प्रशालेच्या साईआर्या काटकरने 8 गुणांसह जिल्हा क्रीडा परिषद व पुणे मनपा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले.
खराडी येथील राजाराम भिकू पठारे मैदानाच्या हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेत साईआर्या काटकरने (8 गुण) टायब्रेकर मधील गुणवारीनुसार प्रथम स्थानाला गवसणी घातली. नवव्या व अंतिम फेरीत साईआर्याने समृद्धी जोशीला (कलमाडी हायस्कूल) पराभूत केले. आबासाहेब गरवारे महाविद्यालायाच्या दिशा ढोरेने (8 गुण) दिल्ली पब्लिक स्कूलच्या मेहुली महापात्राला पराभूत करताना दुसरे स्थान मिळविले. कलमाडी हायस्कूलच्या समृद्धी जोशी (7 गुण) तिसरे, मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगरच्या संस्कृती पाटीलने (7 गुण) चौथे, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अदिती खाडेने पाचवे (6 गुण), श्री सिद्धीविनायक महिला महाविद्यालायाच्या पल्लवी घाडेकरने (5.5 गुण) सहावे स्थान राखले.

अखेरच्या फेरीचे काही निकाल –
समृद्धी जोशी (कलमाडी हायस्कूल, 7) पराभूत वि साईआर्या काटकर (सिंहगड स्प्रिंग डेल, 8)
दिशा ढोरे (आबासाहेब गरवारे महाविद्यालय, 8) वि वि मेहुली महापात्रा (दिल्ली पब्लिक स्कूल, 5)
योगिता वाघेला (5) पराभूत वि संस्कृती पाटील (मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर, 7)
पूजा कुशवाह (फर्ग्युसन महाविद्यालय, 5) पराभूत वि अदिती खाडे (फर्ग्युसन महाविद्यालय, 6)
वैष्णवी कांबळे (फर्ग्युसन महाविद्यालय, 5) बरोबरी नेहा गजबे (सेंट मिराज, 4.5)
वैष्णवी भाउबंडे (4) पराभूत वि पल्लवी घाडेकर (श्री सिद्धीविनायक महिला महाविद्यालय, 5.5)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)