आंतरशालेय फुटबॉल : गुरुकुल, एसएसपीएमएस, कलमाडी हायस्कूल विजयी 

न्यू इंग्लिश स्कूल, सेंट पॅट्रिक्‍सची आगेकूच 
प्रभात वृत्तसेवा 
पुणे – गुरूकुल हायस्कूल, सिटी इंटरनॅशनल स्कूल, एसएसपीएमएस (डे) स्कूल या संघांनी 14 वर्षांखालील मुलांच्या गटातून विजय नोंदविताना जिल्हा क्रीडा परिषद व पुणे मनपा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली.
एसएसपीएमएस मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रेंजहिल्स येथील गुरूकुल हायस्कूल संघाने बाणेरच्या द आर्किड स्कूलचा 1-0ने पराभव केला. सामन्यातील एकमेव गोल हेमांग गायकवाड याने 22व्या मिनिटाला केला.
अन्य सामन्यात कोथरूडच्या सिटी इंटरनॅशनल स्कूलने येरवडा येथील एसएनबीपी हायस्कूलचा 3-0ने धुव्वा उडवित दुसरी फेरी गाठली. विजयी संघातर्फे सुहृद घन याने शानदार कामगिरी करीत 2 गोल (9 आणि 11वे मिनिट) नोंदविले. उर्वरित 1 गोल हर्षवर्धन नेरपगार याने 23व्या मिनिटाला केला. रोमन सुजल याने केलेल्या गोलच्या जोरावर एसएसपीएमएस (डे) संघाने सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूलवर 1-0ने मात केली.
रमणबाग येथील न्यू इंग्लिश स्कूलने कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूल संघाला 1-0ने नमवित 17 वर्षांखालील मुलांच्या गटातून विजयी सलामी दिली. विजयी संघातर्फे ऋत्विक माळवे याने 22व्या मिनिटाला गोल केला. एरंडवणा येथील डॉ. शामराव कलमाडी हायस्कूल संघाने रेसकोर्स येथील आर्मी पब्लिक स्कूलला 3-0ने सहजपणे पराभूत केले. सामन्याला प्रारंभ झाल्यावर अथर्व कदमने 10 मिनिटांच्या आत 2 गोल (7 वे व 9 वे मिनिट) करीत कलमाडी संघाचा विजय निश्‍चित केला. मिहीर जाधवने 19व्या मिनिटाला गोल करीत विजयाचे अंतर वाढविले.
सेंट पॅट्रिक्‍स हायस्कूलने क्‍लाईन मेमोरियल स्कूलवर 3-0 अशा फरकाने सहजपणे सरशी साधली. 2 गोल करणारा (18 वे आणि 25 वे मिनिट) आकाश सारूलकर विजयाचा शिल्पकार ठरला. ऑस्टीन मॅथ्यू (9वे मिनिट) याने एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली.
सविस्तर निकाल
पहिली फेरी – 14 वर्षांखालील मुले – गुरुकुल हायस्कूल, रेंजहिल्स – 1 (हेमांग मेवाड) वि.वि. द आर्किड स्कूल, बाणेर : 0. सिटी इंटरनॅशनल स्कूल, कोथरूड – 3 (सुहृद घन 2, हर्षवर्धन नेरपगार 1) वि.वि. एसएनबीपी, येरवडा – 0. एसएसपीएमएस (डे) – 1 (रोमन सुजल) वि.वि. सेवासदन – 0.
17 वर्षांखालील मुले : न्यू इंग्शिल स्कूल, रमणबाग – 1 (ऋत्विक माळवे) वि.वि. सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा – 0.सेंट पॅट्रिक्‍स हायस्कूल – 3 (आकाश सारूलकर 2, ऑस्टीन मॅथ्यू 1) वि.वि. क्‍लाईन मेमोरियल स्कूल – 0.डॉ. शामराव कलमाडी हायस्कूल, एरंडवणा – 3 (अथर्व कदम 2, मिहीर जाधव 1) वि.वि. आर्मी पब्लिक स्कूल, रेसकोर्स – 0.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)