आंतरशालेय टेबल टेनिस : सिंबायोसिस प्रायमरी अंतिम फेरीत दाखल

आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेत सिंबायोसिस सेकंडरी स्कूलविरुद्ध लढत
प्रभात वृत्तसेवा
पुणे – सिंबायोसिस प्रायमरी संघाने ऍमनोरा स्कूलवर एकतर्फी मात करताना जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग (पुणे महानगरपालिका) आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेच्या 14 वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सिंबायोसिस प्रायमरी संघाची विजेतेपदासाठी सिंबायोसिस सेकंडरी स्कूलविरुद्ध लढत होईल.

प्रभात रस्त्यावरील सिंबायोसिस स्कूलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत सिंबायोसिस प्रायमरी स्कूलने ऍमनोरा स्कूलचा 3-0ने पराभव केला. यात सिंबायोसिसकडून सनत जैनने क्षितिज शहाला 11-2, 11-3 असे, तर वेदांग जोशीने सूरज मिश्राला 11-6, 11-4 असे नमविले. अनुज अभ्यंकरने लिंगेश्वर राववर 11-4, 11-6 अशी मात केली. यानंतर दुसऱ्या उपान्त्य लढतीत सिंबायोसिस सेकंडरी स्कूलने अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलचा 3-0ने पराभव केला. यात सिंबायोसिसच्या अर्णव भालवलकरने असीम केळकरवर 11-6, 9-11, 12-10 असा रोमहर्षक विजय मिळवला. आर्चन आपटेने कौशल कुलकर्णीवर 11-6, 11-6 अशी, तर सोहम जामसांडेकरने आयुष जायदेवर 1-11, 11-9, 11-6 अशी मात केली.

सविस्तर निकाल –
14 वर्षांखालील मुले – उपान्त्यपूर्व फेरी –
1) ऍमनोरा स्कूल वि. वि. बालशिक्षण विद्या मंदिर 3-2 (क्षितिज शहा वि. वि. ओजस कुरलेवर 11-9, 9-11, 11-3, सूरज मिश्रा पराभूत वि. जय गद्रे 11-13, 11-9, 9-11, लिंगेश्वर राव पराभूत वि. हर्ष धानवटकर 11-13, 6-11, सूरज मिश्रा वि. वि. ओजस कुरळेकर 11-1, 11-2, क्षितिज शहा वि. वि. जय गद्रे 11-7, 6-11, 11-2).
2) सिंबायोसिस सेकंडरी स्कूल वि. वि. डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल, औंध 3-1 (अर्णव भालवलकर वि. वि. हर्ष कुमार 11-4, 11-7, आर्चन आपटे वि. वि. राज चांडक 11-3, 11-7, वरुण खरे पराभूत वि. आयुष रॉय 11-8, 7-11, 7-11, आर्चन आपटे वि. वि. हर्ष कुमार 11-6, 11-6).
3) सिंबायोसिस प्रायमरी वि. वि. बिशप्स स्कूल, कल्याणीनगर 3-0 (वेदांग जोशी वि. वि. कार्तिक अय्यर 11-4, 9-11, 11-3, सनत जैन वि. वि. आर्यन सेठी 11-4, 11-1, अनुज अभ्यंकर वि. वि. निशांत लांजेवार 11-5, 11-6).
4) अभिनव इंग्लिश स्कूल वि. वि. सिटी इंटरनॅशनल स्कूल, कोथरूड 3-2 (कौशल कुलकर्णी पराभूत वि. अनय पोतदार 12-10, 8-11, 10-12, असीम केळकर वि. वि. साहील पाटकर 11-4, 6-11, 12-10, आयुष जायदे वि. वि. तेजस सबनीस 13-11, 11-5, असीम केळकर पराभूत वि. अनय पोतदार 9-11, 9-11 कौशल कुलकर्णी वि. वि. साहील पाटकर 11-6, 11-6).
उपान्त्य फेरी- 1) सिंबायोसिस प्रायमरी वि. वि. ऍमनोरा स्कूल 3-0 (सनत जैन वि.वि. क्षितिज शहा 11-2, 11-3, वेदांग जोशी वि.वि. सूरज मिश्रा 11-6, 11-4, अनुज अभ्यंकर वि.वि. लिंगेश्वर राव 11-4, 11-6), 2) सिंबायोसिस सेकंडरी स्कूल वि.वि.अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल 3-0 (अर्णव भालवलकर वि.वि. असीम केळकर 11-6, 9-11, 12-10, अर्चन आपटे वि.वि. कौशल कुलकर्णी 11-6, 11-6, सोहम जामसांडेकर वि.वि. आयुष जायदे 1-11, 11-9, 11-6).
फोटो ओळ – जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग (पुणे महानगरपालिका) आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेच्या 14 वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीतील एक क्षण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)