आंतरराष्ट्रीय सौर आघाडीबरोबर भारताचा करार

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि परराष्ट्र मंत्रालयाने आज करार केला. या करारामुळे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आता अधिकारप्राप्त संस्था झाली आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय भारतात असून स्वतंत्रपणे कार्य करण्यासाठी आवश्‍यक अधिकार या करारामुळे मिळणार आहेत.

ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आर.के.सिंह यांच्या उपस्थितीत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंह आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अंतरिम महासंचालक उपेंद्र त्रिपाठी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी पॅरिस येथे संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या उपस्थितीत 30 नोव्हेंबर 2015 ला आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा संयुक्तपणे शुभारंभ केला. सौर ऊर्जेसाठीचे तंत्रज्ञान कमी खर्चात उपलब्ध करणे हे आघाडीचे उद्दिष्ट आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)