आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धा : सविती बूराला सुवर्ण 

नवी दिल्ली – भारताची गुणवान महिला बॉक्‍सर सवीती बूरा सुवर्णपदक संपादन करताना हिने रशियातील कॅस्पियास्क येथे सुरू असलेल्या उमाखानोव्ह आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेचा आजचा दिवस गाजविला. सवीतीने महिलांच्या 75 किलो वजनगटाच्या अंतिम लढतीत रशियाच्याच ऍना ऍनफिनोजेनोव्हा हिचा संघर्षपूर्ण झुंजीनंतर पराभव करीत सुवर्णपदकाची निश्‍चिती केली.

वास्तविक अंतिम लढतीत ऍनालाच विजयासाठी पसंती देण्यात येत होती. परंतु जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेत्या सवीतीने पहिल्यापासून वर्चस्व गाजविताना ऍनाला निष्प्रभ केले. इतकेच नव्हे तर सर्व पंचांनी लढतीअखेर सवीतीलाच सुवर्णपदकासाठी पसंती दिली. मात्र पिंकी जांग्राला 51 किलो गटांत, तसेच पवित्राला 60 किलो वजनगटांत उपान्त्य फेरीतच पराभव पत्करावा लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
दरम्यान पुरुषांच्या 56 किलो गटातील अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताच्या गौरव बिधुरीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच ब्रिजेश यादवने पुरुषांच्या 81 किलो गटात, तसेच वीरेंदर कुमारने पुरुषांच्या 91 किलो गटात अंतिम फेरीत धडक मारताना सुवर्णपदकासाठी आपले आव्हान कायम राखले. ब्रिजेशसमोर अंतिम फेरीत रशियाच्या मुराद रबाडानोव्हचे आव्हान आहे. तसेच अंतिम लढतीत वीरेंदरची गाठ स्वीडनच्या अलेक्‍झांडर व्हॉलबालेशी पडेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)