आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आजपासून पुण्यात 

सुशांत चिपलकट्टी स्मृती करंडक 
थायलंडच्या खेळाडूंना अग्रमानांकन 
प्रभात वृत्तसेवा 
पुणे – महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना आणि पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटना यांच्यातर्फे सुशांत चिपलकट्टी याच्या स्मरणार्थ योनेक्‍स-सनराईज इंडिया ज्युनियर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. चार दिवस चालणारी ही स्पर्धा पुण्यातील मॉडर्न संकुल, शिवाजीनगर येथे उद्या (गुरुवार) सुरू होत असून सकाळी 8-45 वाजता स्पर्धेचे उद्‌घाटन होणार आहे.

पुरुष व महिला एकेरी, पुरुष व महिला दुहेरी, तसेच मिश्र दुहेरी अशा पाच गटांमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेसाठी एकूण 15 हजार डॉलर्स पारितोषिक रक्‍कम ठेवण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्व सामने प्रत्येकी 21 गुणांच्या बेस्ट ऑफ थ्री फॉरमॅटमध्ये खेळविले जातील, अशी माहिती स्पर्धा संयोजन व स्पर्धा सचिव एस. व्ही. नातू यांनी दिली आहे.
स्पर्धेची पात्रता फेरी आज पार पडणार असून एक सप्टेंबर रोजी मुख्य ड्रॉचे सामने होतील. उपान्त्यपूर्व व उपान्त्य फेरीचे सर्व सामने शनिवारी होणार असून रविवारी सर्व गटांचे अंतिम सामने पार पडतील. कुनलावत विदितसार्न आणि पट्टारासुदा चायवान या थायलंडच्या खेळाडूंना अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीचे अग्रमानांकन देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)