आंतरराष्ट्रीय परिषदेत एकशे सात शोधनिबंध सादर

तळेगाव दाभाडे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नूतन अभियांत्रिकीमध्ये अकरावी आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली.

अभियांत्रिकी आणि मानव संसाधन विषयांतील सध्याची प्रगती या विषयावर ही परिषद आयोजित केली होती. नायजेरिया येथील मोदिमा अदामा विद्यापीठाचे डॉ. अबु बकर मोहम्मंद, अबु बकर ताफावा, बेलावा विद्यापीठाचे डॉ. एशातु अदामु, टांझानिया विद्यापीठाच्या डॉ. प्रतिमा बॅनर्जी, अमरावती विद्यापीठाचे प्राचार्य डॉ. बी. एन. जाजू यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय शोध निबंधांचे सादरीकरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, विश्वस्त चंद्रकांत शेटे, महेशभाई शहा, गणपतराव काळोखे तसेच केशवराव वाडेकर, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे व्यासपीठावर उपस्थित होते.

बांबू तंत्रज्ञान, लहान मुलांची सुरक्षितता, अंध व्यक्तींसाठीची स्मार्ट काठी, बायोडिझेल आदी एकूण एकशे सात शोधनिबंध सदर करण्यात आले. डॉ. अबुबकर मोहम्मंद यांनी संशोधनाच्या विविध क्षेत्रांचे पर्याय विद्यार्थ्यांसमोर विशद करून संशोधन प्रक्रिया कष्टाची असल्याने चिकाटी ठेवा असे आवाहन केले. डॉ. जाजू यांनी विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती जोपासावी, सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी तंत्रद्यानाचा वापर करावा, असे मत व्यक्त केले. प्रा. विकास नांदगावकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रा. कल्याणी काटोले आणि प्रा. अदिती दास यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)