आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत श्रावणी चौंडकरचे यश

नायगाव- पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील नायगाव येथील श्रावणी शिवाजी चौंडकर हिने नुकत्याच दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला आहे. अखिल भारतीय सांस्कृतिक संघ ग्लोबल कॉंसिले ऑफ आर्टस आणि कल्चर तर्फे कल्चरल डान्स स्पर्धेतील ओलिपॉंड मायनर गटात सोलो डान्स स्पर्धेत श्रावणी चौंडकर हिने सिल्वर पदक पटकावले. आंतरराष्ट्रीय स्तरावर 2016 मध्ये तिने श्रीलंकेमध्ये ब्रांज पदक मिळविले होते. याविषयी श्रावणी चौंडकर हीने सांगितले की, लहानपणापासूनच मला नृत्याची आवड होती व माझ्या नृत्य शिक्षका सुप्रिया यांनी योग्य मार्गदर्शन केल्याने माझा आत्मविश्वास वाढला. पुणे, श्रीलंका व दुबई येथे झालेल्या स्पर्धेमधून मला चांगले अनुभव मिळाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)