आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस…..

आज १३ आॅगस्ट… आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन. हा दिवस  पहिल्यांदा 13 व्या ऑगस्ट रोजी, 19 76 मध्ये साजरा करण्यात आला. नावावरून या दिवसाची कल्पना कोणालाही येईल. दरम्यान, उजव्या हाताने काम करणे कधीही सोयीचे असते, अस समज समाजात आहे. हाच समाज दूर करण्यासाठी आणि समाजातील डावखुऱ्या असणाऱ्या लोकांविषयी जागरुकता आणण्याच्या दृष्टीने हा दिवस साजरा करण्यात येतो.
जगाच्या लोकसंख्येपैकी 7 ते 10 टक्के लोक आपल्या डाव्या हाताने आपली सर्व कामे करतात. अर्थात हे लोक डावखुरे म्हणून ओळखले जातात. डाव्या हाताने काम करणारे काहीजण त्यांच्या उजव्या हातानेदेखील तेवढ्याच चपखलपणे काम करतात. पण हेच डावखुरे लोक आपल्या अद्वितीयपणा आणि अंगात वेगळ्या गुणामुळे आपली वेगळी ओळख निर्माण करतात असेदेखील म्हटले जाते. त्याची इतिहासापासून ते आजपर्यंत उदाहरणे आहेत.
13 ऑगस्ट 1997 रोजी डावखुरा-हँडर डे क्लबद्वारे डावखुरा दिन घोषित करण्यात आली होती. 13 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन दिवस साजरा केला जातो. दरवर्षी विशिष्ट लोकांच्या सिनिस्ट्रेटिटीचा उत्सव साजरा करणे आणि डावखुरा असण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल या दिवशी जागरुकता निर्माण करण्याचे काम करण्यात येते. डावखुऱ्या व्यक्तींच्या यादीत आज अनेक दिग्गज नेते, संशोधक, अभिनेते, खेळाडू यांचा समावेश आहे. ज्यांनी आपल्या या डाव्या हाताच्या वापरला कधीच कमी न लेखता आयुष्यात यश संपादन केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, चार्ली चाप्लिन, रतन टाटा, अल्बर्ट आइन्स्टाइन, ज्युलिया रॉबटर््स, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, मर्लिन मन्रो, मेरी कोम, सुरेश रैना, युवराज सिंह, आशा भोसले, बराक ओबामा, बिल गेट्स यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डावखुऱ्या लोकांच्या यादीत समावेश केला जातो. भारतात संदीप विष्णोई यांनी इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबची स्थापना केली असून, क्लबचे एक लाखावर सदस्य आहेत. डावखुºया विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, डावखुºया महिला उद्योजकांना आर्थिक साहाय्य तसेच इतर योजना या संस्थेमार्फत नियमितपणे राबविल्या जातात. अचाट गुणवत्तेने जगभरात नावलौकिक मिळविलेल्या डावखुऱ्या व्यक्ती सर्वांच्या परिचयाच्या आहेत, पण ते ‘डावखुरे’ असल्याची माहिती सर्वांना असेलच, असे नाही. पण त्यांचे कर्तृत्व हे सर्वांनाच परिचयाचे आहे. त्यामुळे डावखुरे होणे हे न्यूनगंड न मानता तसेच डावखुऱ्या लोकांविषयी गैरसमज न करून घेता त्यांना देखील तेवढ्याच मानाने वागवले पाहिजे हाच या दिवसाचा खरा संदेश असणार आहे…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)