आंतरमहाविद्यालयीन स्पोर्टस्‌ लीग शिअरफोर्सचे आयोजन

पुणे: विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चरच्या वतीने आर्किटेक्‍चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन वार्षिक क्रीडा स्पर्धा, शिअरफोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पोर्टस्‌ लीगमध्ये फुटबॉल, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. वानवडी येथील एस. आर.पी.एफ मैदानावर दिनांक 11 ते 13 जानेवारी दरम्यान या स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे सचिव जितेंद्र पितळीया यांनी दिली.

जितेंद्र पितळीया म्हणाले, स्पर्धेमध्ये पुण्यातील 16 वास्तुकला महाविद्यालयाचे 90 संघातील 600 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. बास्केटबॉल, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन 11 जानेवारी रोजी होणार आहे. स्पर्धेचे यंदा 8 वे वर्ष आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्पर्धेमध्ये पुण्यातील 16 महाविद्यालयातील संघाचा समावेश आहे. यामध्ये मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, आकुर्डी, डी . वाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, लोहगाव, चेंबूर ट्रॉमबे एज्युकेशन सोसायटी चे कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, ए . डि . ए . मिनर्व्हा कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, आलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, डी . वाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर आंबी, ब्रिक्‍स स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर, आयोजन स्कूल ऑफ डीझाईन, मिनर्व्हा कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, पी. व्ही पी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, इंदिरा कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर अँड डीझाईन, भारतीय कला प्रसारिणी सभा कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर कॉलेज आदी महाविद्यालये स्पर्धेत सहभागी होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)